मी कुठेही हात दाखवायला जात नाही ; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी दौऱ्यावर गेले होते. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक साईबाबांचं दर्शन घेतलं. शिर्डी दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाला हात दाखवल्याचा आरोप होत आहे.या मुद्द्यावरून शरद पवार यांनी शिंदेंवर टीका केली. ‘मी काही ज्योतिषी नाही. मुळात माझा ज्योतिषावर विश्वास नाही. त्यामुळे मी कुठे हात दाखवायला जात नाही.

आत्मविश्वास नसला की मग देवदर्शनासाठीचे दौरे वाढतात, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.

🤙 9921334545