पक्ष बिक्ष नंतर बघूया ; प्रथम कारवाई झाली पाहिजे : खा. उदयनराजे भोसले

सातारा : मी भाजपाचा खासदार आहे. मात्र मी शिवाजी महाराज यांचा वंशज म्हणून बोलत आहे. हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. पक्ष बिक्ष नंतर बघूया,” असेही उदयनराजे भोसले म्हणाले.

कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्यावर कारवाई होणार की नाही ते पाहावे लागेल. मी या मुद्द्यावर कोणाशीही तडजोड करणार नाही. कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्यावर कारवाई होणार याचा मला विश्वास आहे,” असेही उदयनराजे यांनी सांगितले.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यभरातून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या.राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करावी तसेच भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनीदेखील कोश्यारी आणि त्रिवेदी यांची हकालपट्टी करावी अशी रोखठोक भूमिका घेतली आहे.

असे असले तरी उदयनराजेंच्या भाजपा पक्षातील नेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र कोश्यारी आणि त्रिवेदी यांची पाठराखण केली आहे. याच कारणामुळे उदयनाराजेंची आगामी वाटचाल कशी असणार, असा प्रश्न विचारला जात आहे. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.“मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. जे घडले ते सर्वांनाच माहिती आहे. कोणताही पक्ष असला तरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्त सुधांशू त्रिवेदी यांची हकालपट्टी करावी, अशी माझी भूमिका आहे. माझ्या या भूमिकेत बदल होणार नाही. देवेंद्र फडणवीस या प्रकरणात काय बोलले, ते त्यांनाच विचारावे,” अशी भूमिका उदयनराजे यांनी घेतली.सर्व नेत्यांना एकाच मंचावर बोलवावे, प्रत्येक पक्षाने कोश्यारी, त्रिवेदी यांनी केलेल्या विधानावर आपली भूमिका स्पष्ट करावी.

News Marathi Content