महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पहाल तर याद राखा ; संजय राऊत यांचा इशारा

मुंबई : गुजरातने महाराष्ट्राचे उद्योग पळवायचे आणि कर्नाटकने गावे, तालुके पळवायचे. महाराष्ट्र सह्याद्रीच्या नकाशावरुन संपवून टाकायचा असे काही संगनमत आहे का?,” असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

सरकार कमजोर असेल पण आजही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना महाराष्ट्रावर आलेले प्रत्येक संकट परतवून लावेल.

आम्हाला रक्त सांडण्याची भीती नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मी धमकी देतोय समजा, महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा. तुमची बकबक बंद करा. आमचं सरकार जरी गुढग्यावर बसलेले असले तरी शिवसेना स्वाभीमानाने उभी आहे,” असे संजय राऊत म्हणाले.”महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे सीमाभागाचा पदभार होता पण गेल्या 10 वर्षात ते तिथे का गेले नाहीत. किती मंत्री सीमाभागात गेले ते मला सांगा? चंद्रकांत पाटील कर्नाटकात जातात आणि कन्नड राष्ट्रगीत म्हणतात आणि त्यांचे कौतुक करुन येतात,” असेही राऊत म्हणाले.