सुषमा अंधारे यांची कणकवलीत सभा सुरू होण्याआधीच बघायला मिळाला हाय व्होल्टेज ड्रामा…

सिंधुदुर्ग : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे पोहोचलीय. विशेष म्हणजे सुषमा अंधारे यांची कणकवलीत सभा सुरु होण्याआधी चांगलाच हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला.

भाजपचे कार्यकर्ते सभास्थळी दाखल झाले. अंधारे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विषयी आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी वैयक्तिक टीका केली तर लगेच प्रत्युत्तर देणार, असा पवित्रा या कार्यकर्त्यांनी घेतला होता. पण पोलिसांना भाजप कार्यकर्त्यांच्या या मनसुब्याची माहिती मिळाली आणि मोठा वाद टळला.

सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणात राणे परिवारावर टीका केली तर भाजप कार्यकर्ते लगेच प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत होते. त्यामुळे भाजपचे अनेक कार्यकर्ते अंधारे यांच्या सभास्थळी दाखल झाले होते. अनेक कार्यकर्ते अजून येत होते. भाजप कार्यकर्त्यांच्या या डावाबद्दल पोलिसांना खबर लागली आणि त्यांनी कार्यकर्त्यांना सभास्थळावरुन हटवलं.

पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना सभास्थळावरुन हटवलं असलं तरी ही यात्रा सध्या कणकवलीत वादाच्या सावटाखाली असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरुय.

🤙 8080365706