साई रिसॉर्ट तोडकामाबाबत कारवाईला स्थगिती

दापोली साई रिसॉर्ट तोडकामाबाबतचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

त्यावेळी तोडकामाबाबत उच्च न्यायालय आदेश देण्याची शक्यता आहे. रिसॉर्टचे तोडकाम आज होणार असल्याने भाजप नेते किरीट सोमय्या हे दापोलीत दाखल झाले होते.दापोली येथील साई रिसॉर्ट हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या मालकीचे असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. परब यांनी कोरोना लॉकडाउन काळात नियमबाह्य पद्धतीने रिसॉर्टचे बांधकाम केले असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.

त्यानंतर सोमय्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध खात्यांकडे पाठपुरावा केला होता. आज रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून रिसॉर्टचे तोडकाम करण्यात येणार होते. या तोडकामासाठी किरीट सोमय्या हे मुरुड-दापोलीत दाखल झाले होते.

यावेळी त्यांनी म्हटले की, हे रिसॉर्ट ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचे स्मारक आहे. हे स्मारक पाडण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार असून अनिल परब यांना प्रत्येक पैशाचा हिशोब द्यावा लागणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले.

🤙 8080365706