पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी…

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीव मारण्याची धमकी देणारा मेसेज मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे पाठवण्यात आला आहे.

या घटनेमुळे पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे.मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या क्रमांकावर आज (मंगळवार) सकाळी एक व्हॉटसअप मेसेज आला. या मेसेजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे ठार मारण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली. या मेसेजमुळे एकच खळबळ उडाली. याबद्दल तातडीने वाहतूक शाखेने वरिष्ठ पोलिसांना याबद्दलची माहिती दिली.

वरळी पोलिस स्टेशनमध्ये याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली असून, मेसेज कुणी पाठवला, याचा शोध घेतला जात आहे.पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार, मुंबई पोलिसच्या ट्रॅफिक कंट्रोल मोबाईल क्रमांकावर हा धमकीचा मेसेज आला. यावेळी कंट्रोल नंबरवर अनेक ऑडिओ क्लिपसही आल्या आहेत.

त्यापैकी एका क्लिपमध्ये मोदी यांना ठार मारण्याचा दावा केला आहे. “अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे गुंड देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करणार आहेत” आणि देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे या ऑडीओ क्लिपमध्ये म्हटले आहे.

🤙 8080365706