कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासाची दूरदृष्टी असलेले नेतृत्व नियतीने हिरावून नेले आहे : आर. के. पवार

कोल्हापूर : आण्णा हे राजकारणी नव्हते, ते होते समाजकारणी. उत्कृष्ट फुटबॉलपट्टू, यशस्वी उद्योजक, प्रत्येक गरजवंताच्या मदतीला धावून जाणारे मदतगार, सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आदर्श सामाजिक नेतृत्व आणि कोल्हापूर शहराच्या विकासाचे व्हीजन घेऊन सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, संस्कृतिक, उद्योग, आरोग्य अशा विविध क्षेत्रात कर्तत्वाने ठसा उमटवलेले अष्टपैलू व्यक्तीमत्त्व व कोल्हापूर शहराचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासाची दूरदृष्टी असलेले नेतृत्व नियतीने हिरावून नेले आहे : राष्ट्रवादी कॉग्रेस, शहराध्यक्ष आर. के. पवार यांनी व्यक्त केल्या भावना.

शाळेतील बेंचवर असलेले त्यांचे मित्र डॉक्टर (डॉ.अजय केणी, डॉ.श्रीनिवास रोहिदास) होण्यासाठी झटत होते. पण आण्णांनी आयटीआय करून उद्योजक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. एका लेथ मशिनवर वडिलांना हातभार लावता लावता दोन लेथ मिशिन घेतली. वाय.पी.पोवार नगरात कारखाना सुरू केला. आणि तेथून पुढे आण्णांनी मागे वळून पाहिले नाही. गोकूळ शिरगाव मध्ये एक युनिट सुरू केले. फाऊंड्री सुरू झाली. दोन लेथ मशिन एकावेळी चालविणाऱ्या आण्णांनी पाहता पाहता कोट्यवधींची जाधव इंडस्ट्रीज उभा केली. दहा देशांत निर्यातीपर्यंत मजल मारली. एक दोन नव्हे तर उद्योजकांच्या ५ संघटनांवर वेगवेगळ्‍या पदावर काम केले. आठशे-हजार तरुणांच्या हाताला काम दिले. स्वतः सारखे तळागळातील तरुण उद्योजक बनले पाहिजेत, यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले.फुटबॉलच्या मैदानवर किट मध्ये, शहरात साध्या शर्ट,पॅन्ट मधील आण्णा उद्योजकांच्या रांगेत कधी थ्री पीस तर कधी ब्लेझर घालून बसले की मराठी माणूस म्हणून ऊर भरून येत होता. लेथ मशिन असो किंवा व्हीएमसी सीएमसी असे स्वतः लक्ष घालून कामगारांना स्वतःची कंपनी आहे, असा विश्‍वास देणारा एक उद्योजक म्हणून आण्णांकडे पाहिले जात होते.एक फुटबॉलपटू, तालमी मंडळाचा कार्यकर्ता म्हणून कोल्हापुरकरांनी, पेठा-पेठातल्या मतदारांनी त्यांना अवघ्या वीस दिवसात आमदार केले. कोल्हापुरचा ‘आमदार’ ही मानाची गोष्ट. पण हा मान घेवून चंद्रकांत जाधव मिरवताना दिसले नाहीत. मोजकं बोलणं पण जनतेशी अधिक संवादी राहणं त्यांचा स्वभाव होता. शुन्यातून यशस्वी उद्योजक नंतर आमदारकी मिळवलेले आण्णा कायम जमिनीवर राहिले.

कोल्हापूरी रांगडेपणा त्याच्यात वरुन दिसत नव्हता. ते मृदू होते. पण कामाचा धडाका मात्र कायम अंगी होता. त्यांनी जगात भारी आपल कोल्हापूर करायचं, कोल्हापूर शहराचा सर्वांगीण विकास करायचा याचा निश्चय करून ते राजकारणात आले. कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासाचे नियोजनबद्ध आराखडे तयार केले. त्यासाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू केला. दरम्यान जागतिक कोरोना महामारीचे संकट आले आणि सर्वच विकासकामे ठप्प झाली. अण्णांनी कोरोनानंतर ती कामे करता येतील, आता जनतेच्या आरोग्याच्या कामासाठी झोकून देऊन काम सुरू केले. ते स्वतः कोरोना ग्रस्त झाले, तरीही काम थांबले नाही. महापूराच्या काळात त्यांनी झोकून देऊन केलेले काम आजही कोल्हापूरकरांच्या स्मरणात आहे. महापूर काळात नागरिकांसह, जनावरे तसेच बापट कॅम्प येथील गणेश मूर्ती ही सुरक्षित स्थळी स्थलांतरित केल्या. स्थलांतरित नागरिकांची राहण्याची, जेवणाची योग्य व्यवस्था करणे, त्यांना औषध उपचार उपलब्ध करून देणे, नागरिकांच्या बरोबर जनावरांचे स्थलांतरांची व्यवस्था करणे अशा सर्वच पातळीवर नियोजनात पुढाकार घेतला. शहराचा पाणीपुरवठा खंडित झाल्यानंतर स्वखर्चाने पाण्याची टँकर उपलब्ध करून दिले. शहराचा पाणीपुरवठा लवकर सुरळीत व्हावा, यासाठी त्यांची सुरू असलेली धडपड सर्व कोल्हापूरकरांनी पाहिलेली आहे.उद्योजकांच्या समस्या आणि त्या सोडविण्यासाठी आण्णांचे सुरू असलेली धडपड सर्वानाच माहीत आहे. वीज दरवाढीचा प्रश्न, एमआयडीसीतील बांधकाम व जागेचा प्रश्न अशा विविध समस्या त्यांनी शासनापर्यंत पोचवल्या. तसेच त्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करत होते. कोल्हापुरातील विमानतळाचे विस्तार व्हावा, विमान सेवा सुरळीत सुरू झाल्यानंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उद्योग कोल्हापुरात येथील यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते.कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली पाहिजे यासाठी ते नेहमीच हातावर कृती समिती आणि शहरातील नागरिकांच्या बरोबर आघाडीवर होते.यातच त्यांना दोनदा कोरोनाने गाठलं तरी त्यांनी सेवेचा वसा सोडला नाही. निवांत बंगल्यावर बसुन आण्णांनी आराम फरमावला असता, किती तरी ऐश्वर्य त्यांच्या घरी लोळत होतं. पण त्यांनी आपली आमदारकी लोकांसाठी बहाल केली. यातच त्यांच आजारपण वाढलं आणि त्यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या जाण्याने कोल्हापुरचं मोठ नुकसान झालं. कोल्हापुराने एक फुटबॉलपटू, उद्योजक, चांगला लोकप्रतिनिधी असे बहुआयामी नेतृत्व गमावला.

🤙 9921334545