
आरोग्याच्या सगळ्या चाव्या स्वयंपाकघरात असतात, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कोलेस्टरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठीही स्वयंपाक घरात सापडणाऱ्या या ५ पदार्थांची खूप मदत होते.
बदलत्या जीवनशैलीमुळे कोलेस्टरॉल, रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह असे अनेक आजार वाढू लागले आहेत. कमी वयातच असे आजार होणाऱ्यांची संख्याही आता वाढते आहे. हे आजार नियंत्रित ठेवण्यासाठी जेवढा वैद्यकीय सल्ला आणि व्यायाम महत्त्वाचा असतो, तेवढाच आहारातला बदलही गरजेचा असतो. म्हणूनच कोणत्या आजारासाठी कोणता पदार्थ किती प्रमाणात खावा, याचा अचूक गणित माहिती असायला पाहिजे. म्हणूनच कोलेस्टरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्या स्वयंपाक घरातले कोणते पदार्थ किंवा मसाले उपयुक्त ठरतात.
बदलत्या जीवनशैलीमुळे कोलेस्टरॉल, रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह असे अनेक आजार वाढू लागले आहेत. कमी वयातच असे आजार होणाऱ्यांची संख्याही आता वाढते आहे. हे आजार नियंत्रित ठेवण्यासाठी जेवढा वैद्यकीय सल्ला आणि व्यायाम महत्त्वाचा असतो, तेवढाच आहारातला बदलही गरजेचा असतो. म्हणूनच कोणत्या आजारासाठी कोणता पदार्थ किती प्रमाणात खावा, याचा अचूक गणित माहिती असायला पाहिजे. म्हणूनच कोलेस्टरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्या स्वयंपाक घरातले कोणते पदार्थ किंवा मसाले उपयुक्त ठरतात,
हळद: हळदीमध्ये असणारे curcumin नावाचे ॲक्टिव्ह कम्पाऊंड LDL म्हणजेच बॅड कोलेस्टरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. तसेच हळदीतील ॲण्टीऑक्सिडंट्स आणि ॲण्टीइन्फ्लामेटरी घटक फफ्फुस, पँक्रिया तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. दालचिनीहृदयासाठी दालचिनी हा मसाल्यांमधला सर्वोत्तम प्रकार मानला जातो. रक्तप्रवाह सुरळीत चालू रहावा, यासाठी
दालचिनी: अतिशय उपयुक्त ठरते. त्यातील ॲण्टीऑक्सिडंट्स आणि ॲण्टी मायक्रोबियल घटकांमुळे इन्सुलिन निर्मिती व्यवस्थित होते आणि त्यामुळे रक्तातील कोलेस्टरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते.
मिरे : फॅट सेल्सचं ब्रेकडाऊन करण्यासाठी मिरे उपयुक्त ठरतात. त्यामुळे कोलेस्टरॉलची पातळी नियंत्रित राहण्यासही मदत होते. शिवाय त्यातील piperine हा घटक पचन, श्वसन या क्रिया उत्तम होण्यासाठी मदत करतो.
मेथ्या
मेथी दाण्यांमध्ये असणारे काही घटक लिव्हर आणि आतड्यामध्ये कोलेस्टरॉल शोषून घेण्याचं प्रमाण कमी करण्यास मदत करतात. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठीही मेथ्यांची मदत होतेच.
