
नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये तिहार जेलमध्ये असलेले दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.सत्येंद्र जैन यांना जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट मिळतेय.

या व्हीडिओनंतर जेल प्रशासनावर आक्षेप घेतले जात आहेत. याप्रकरणी ईडीने कोर्टात तक्रार दाखल केलीय.केजरीवाल सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन हे मनी लाँड्रिंग प्रकरणात तिहार जेलमध्ये आहेत. जेलमध्ये असूनही जैन हे सुखासीन आयुष्य जगत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. सीवीटीव्ही फुटेजमध्ये ते मसाज घेत आहेत. हा व्हीडिओ समोर आल्यानंतर भाजपने आम आदमी पार्टीवर निशाणा साधला आहे.सत्येंद्र जैन यांना ३० मे रोजी ईडीने ताब्यात घेतलं होतं. सत्येंद्र जैन हे तिहार जेलमध्ये सात नंबरच्या सेलमध्ये आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर जेल अधीक्षक यांच्यासह चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालीय. शिवाय ३५ पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ड्यूटीचं ठिकाण बदललं आहे.
