
मुंबईचा एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक 262 इतका नोंदवला गेला. जो दिल्लीच्या तुलनेत अत्यंत खराब श्रेणीत येतो, ज्याचा AQI 208 होता.
सिस्टम ऑफ एअर क्वालिटी फोरकास्टिंग अँड रिसर्च नुसार, गेल्या आठवड्यात मुंबईचा AQI 251 वर नोंदवला गेला होता जो काल संध्याकाळी आणखी खालावला, तर दिल्लीचा AQI हळूहळू सुधारत आहे.हवेतील प्रदूषणकारी अतिसूक्ष्म कणांचे जमिनीवर राहात असल्याने हवेची गुणवत्ता चांगली असते. मात्र गेल्या काही दिवसांत वाढलेल्या वाहनांच्या धुरामुळे हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे.
हवेतील धूलिकणांची वाढती पातळी ही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे मुंबईतील वातावरणात पर्टिक्युलेट मॅटर (पीएम) 2.5 आहे. PM 2.5 हे हवेतील लहान कण आहेत जे दृश्यमानता कमी करतात,’ असे मत गुफ्रान बेग, संस्थापक आणि प्रकल्प संचालक, SAFAR आणि चेअर प्रोफेसर, NIAS, IISC यांनी व्यक्त केले.
