
कोल्हापूर : महानगरपालिका अंतर्गत विशेषतज्ञ, वैद्यकीय अधिकारी या पदाच्या एकूण 19 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
तर यासाठीचे नोकरीचे ठिकाण कोल्हापूर हे आहे.यासाठीची वयोमर्यादा 70 वर्षापर्यंत आहे तर, यासाठीचा अर्ज शुल्क हा खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी रु. 150/- इतका आहे तर राखील प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 100/- आहे. दरम्यान, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑफलाईन स्वरूपाची आहे.यासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता – उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत एस.पी.ऑफिसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर 416003 हा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.
