राष्ट्रवादीच्या या आमदाराचा पक्षाला रामराम;केला दुसऱ्या पक्षात प्रवेश

मुंबई : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना सत्ताधारी पक्षांकडून टार्गेट केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराने पक्षाला रामराम ठोकला आहे.

गुजरात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच पक्षांकडून या निवडणुकीसाठी जोर लावला जात आहे. मात्र गुजरातमधील राष्ट्रवादीच्या आमदाराने राष्ट्रवादीला जोर का झटका दिला आहे.कंधाल जडेजा असं या आमदाराचे नाव आहे. या आमदाराने नाराज होत राजीनामा दिला आहे. तसेच समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गुजरातमधील एकमेव आमदार होते.गुजरातची निवडणूक ही २ टप्प्यामध्ये होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने निवडणुकी आधीच युती केली आहे. त्यामुळे नाराज आमदार यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला.

🤙 8080365706