कोल्हापूर अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीत शिंदे-कणेरकर पँनेलने विरोधकांचा धुव्वा उडवला ..

कोल्हापूर : कोल्हापूर अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीत सत्तारूढ शिंदे-कणेरकर पँनेलने सर्वच्या सर्व पंधरा जागा जिंकत एकतर्फी विजयी मिळवला. मोठ्या फरकांनी विरोधी पँनेलला हरवून विजय पताका फडकवली.

मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच बँकेचे माजी अध्यक्ष शिरीष कणेरकर यांच्या पँनेलने आघाडी घेतली होती. ही आघाडी कायम राखत शिंदे-कणेरकर पँनेलने विरोधकांचा धुव्वा उडवला.रमणमळा येथील शासकीय गोदामात आज, मंगळवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. निवडणुकीत बँकेचे माजी अध्यक्ष शिरीष कणेरकर व उमेश निगडे यांची प्रतिष्ठा पणास लागली होती. अखेर शिंदे-कणेरकर पँनेलने एकतर्फी विजयी मिळवत बंँकेवर आपले वर्चस्व कायम ठेवले.

🤙 8080365706