शेतकऱ्यांच्या जमिनीच्या बोगस खरेदीचा वस्तुनिष्ठ अहवाल त्वरित पाठवण्याची मागणी..

कोल्हापूर येथे रणदिवेवाडी येथील मागासवर्गीय समाजातील शेतकऱ्यांच्या मागणीबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी चर्चा करताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे

कागल : रणदिवेवाडी ता.कागल येथील मागासवर्गीय समाजातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या बोगस व खोट्या खरेदीपत्राच्या चौकशीचा वस्तुनिष्ठ अहवाल विभागिय आयुक्तालय पुणे याच्याकडे त्वरीत पाठवावा. अशी मागणी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली.

याबाबत अधिक माहिती अशी.रणदिवेवाडी येथील मागासवर्गीय समाजातीलशेतकऱ्यांची गट क्र.१९६० मधील नऊ एकर चोवीस गुंठे इतकी जमीन आहे. 1996 साली खोटी व बोगस कागदपत्रे जोडून व तोतया शेतकरी उभा करून काही जणांनी ही जमीन खरेदी केली आहे.याबाबत गेल्या 25 वर्षापासून हे शेतकरी या खरेदी व्यवहाराची चौकशी व्हावी. बेकायदेशीर खरेदी व्यवहार रद्द करून मूळ जमीन मालकांच्या नावे जमीन करावी. यासाठी लढा देत आहेत. विभागीय आयुक्तालयाकडून याबाबतची मूळ कागदपत्रे सादर करणेबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधितांना आदेश दिले आहेत.त्या अनुसरून सुरू असलेल्या चौकशीचा वस्तुनिष्ठ अहवाल वेळेत सादर करावा. त्यामुळे या शेतकऱ्यांना न्याय मिळेल.अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

यावेळी संजय भोरे, श्रीकांत भोरे,प्रकाश भोरे, अनिल देवमाने, रविंद्र देवमाने,गणेश भोरे, शशिकांत देवमाने, रवींद्र गाडेकर, पिंटू भोरे, लखन दावणे, गणपती देवमाने, बाळू भोरे उत्तम भोरे आदी उपस्थित होते.

🤙 8080365706