थंडीत मेथीचे लाडू आणि सांधेदुखीला लांब ठेवा..

मेथीचे लाडू हा सांधेदुखीवर उत्तम उपाय आहे .या मेथीच्या लाडूतून शरीराला पोषक मूल्यं आणि हवी असलेली ऊब मिळते त्यामुळे सांधेदुखीला लांब ठेवण्यास मदत होते.

थंडी वाढली की सांधेदुखीचा त्रास जाणवतो तो फक्त प्रौढांनाच असं नाही तर पोषणमुल्यांच्या अभावाने हा त्रास आता तरुण वयातल्या मुला-मुलींनाही होतो आहे. तसेच स्तनदा माता यांना तर थंडीत कंबरदुखी, पाठदुखी यांचा त्रास होतो. बाळंतपणानंतर जर नीट काळजी घेतली नाही तर मात्र पुढे संधीवाताचा त्रास होवू शकतो. हा उपाय फक्त औषधं घेऊन होत नाही. असा उपाय तात्पुरता ठरतो. थंडीत सांधेदुखीचा त्रास होत असल्यास, हाडंकाडं दुखत असल्यास किंवा भविष्यात संधिवातासारखा त्रास होवू नये म्हणून प्रभावी घरगुती उपाय म्हणजे मेथीचे लाडू करायचे आणि खायचे.

🤙 8080365706