कुंभी-कासारी साखर कारखान्याची एकरकमी ३१०० रुपये एफआरपी-चंद्रदीप नरके

सांगरूळ (प्रतिनिधी) : कोपार्डे-कुडीत्रे (ता.करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याने सन २०२२-२३ या गळीत हंगामातील एकरकमी प्रतिटन ३१०० रुपये प्रतिटन एफआरपी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना व रघुनाथ दादा शेतकरी संघटनेबरोबर झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी बाजीराव देवाळकर, गुणांजी शेलार, शिवाजी पाटील यांनी अध्यक्ष चंद्रदीप नरके यांच्या ३१०० रूपये एकरकमी एफआरपी घोषणेचे स्वागत केले आहे. यावेळी उपाध्यक्ष निवास वातकर, कार्यकारी संचालक धिरज माने,सचिव प्रशांत पाटील उपस्थित होते. कुंभी कासारी कारखान्याचे या गळीत हंगामात ७ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी संपूर्ण ऊस कारखान्याकडे पाठवावा असे आवाहन त्यांनी केले आहे.