गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत श्री. काळभैरव शेतकरी कामगार विकास आघाडीची घोषणा करण्यात आली आहे.

या आघाडीत संग्रामसिंह नलवडे, शिवाजीराव खोत, बटकडली गट तसेच आमदार राजेश पाटील गट यांचा समावेश आहे. नुकतीच या आघाडीची घोषणा करण्यात आली. या पॅनलमध्ये अनेक मातबरांना संधी देण्यात आली आहे.
श्री काळभैरव शेतकरी कामगार विकास आघाडीचे उमेदवार पुढीलप्रमाणे :
कौलगे कडगाव गट क्रमांक एक-अशोक सखाराम देसाई, विकास पाटील, सुधीर शामराव देसाई.
हनीमनाळ गट क्रमांक दोन- संग्रामसिंह नलवडे, शिवाजीराव दशरथ खोत, विजय बाळासाहेब मोरे.
भडगाव मुंगळी गट क्रमांक तीन- अमरसिंह रामचंद्र चव्हाण,बाबासाहेब पाटील.
नुल नरेवाडी गट क्रमांक चार- रणजीत यादव, वसंतराव चौगुले.
महागाव हरळी गट क्रमांक पाच- बाळकृष्ण परीट, प्रदीप पाटील,संदीप शिंदे.
बिगर उत्पादक सहकारी संस्था एक- शिवाजीराव खोत.
अनुसूचित जाती जमाती- परसू कांबळे.
महिला प्रतिनिधी- शुभांगी देसाई, गीता बाबासो पाटील.
इतर मागासवर्गीय- संदेश सुरेश भटकडली.
भटक्या विमुक्त जमाती- संभाजी नाईक.