नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ च्या आपल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने नेदरलँड्सवर ५६ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात सामनावीर सूर्यकुमार ठरला.

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.फलंदाजी करताना भारताने २० षटकांत २ गडी गमावून १७९ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १२३ धावा करू शकला. सुपर-१२ फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताने नेदरलँडचा ५६ धावांनी पराभव केला. फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत २ गडी गमावून १७९ धावा केल्या. विराट कोहली ४४ चेंडूत ६२ धावा करून नाबाद राहिला आणि सूर्यकुमार यादव २५ चेंडूत ५१ धावा करून नाबाद राहिला.
भारताकडून भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी मोहम्मद शमीने एक गडी बाद केला. या विजयासह टीम इंडिया सुपर-१२ फेरीच्या ग्रुप-२ मध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. भारताचे दोन सामन्यांत दोन विजयांसह चार गुण आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा संघ तीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशचा संघ दोन गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा पुढचा सामना आता दक्षिण आफ्रिकेशी पर्थमध्ये ३० ऑक्टोबरला होणार आहे.