कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या श्री शाहू मार्केट यार्ड येथे दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर गुळाचे सौदे काढण्यात आले.

वडणगे विकास सेवा संस्था मर्या.वडणगे या अडत दुकानात बाजार समितीचे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश जगताप यांचे हस्ते गुळ सौद्याचे उद्धाटन करण्यात आले. दरम्यान,सौदयामध्ये गुळाचे दर प्रतवारीनुसार प्रति क्विंटल रू ३३०० ते ५१०० पर्यंत झाले.
यावेळी अध्यक्ष प्रकाश जगताप यांनी उपस्थित सर्वांना दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या व गुळ हंगाम सुरळीतपणे पार पाडावा असे आवाहन केले. या कार्यक्रमास प्रशासक मंडळाचे सदस्य बाजीराव जाधव, सचिव जयवंत पाटील, उपसचिव राहुल सुरवंशी,के.बी.पाटील,समितीचे अधिकारी, कर्मचारी वर्ग, शेतकरी, अडते, व्यापारी, हमाल, तोलाईदार आदी उपस्थित होते.