रिक्षा चालक मालकांसाठी महामंडळ स्थापन करण्यात यावे-बाबा कांबळे

कोल्हापूर (प्रतिनिधी): रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ तातडीने स्थापन करावे अशी मागणी राष्ट्रीय ऑटो रिक्षा टॅक्सी ट्रान्सफर फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली आहे. आज (शनिवारी) कोल्हापूर प्रेस क्लब येथे आयोजीत पत्रकार परिषदेत त्यांनी याबद्दलची माहिती दिली.

राज्यात वीस लाख रिक्षा मालक असून देशभरामध्ये तीन कोटींपेक्षा अधिक रिक्षा चालक मालक आहेत.रिक्षा चालक मालकांना घरकुल योजना राबवली गेली पाहिजे. तसेच वृद्धपकाळी पेन्शन योजना असणारा कायदा करावा अशा विविध मागण्याही  त्यांनी यावेळी केल्या. या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गफार भाई, नदाफ सुनील सामंत, विकास धोरवडी, गजानन विभुते, महादेव विभुते ,सुभाष सुर्वे, दीपक कांदेकर, गजानन खाते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

🤙 9921334545