खुपिरे (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील खुपिरे येथील बजरंग दूध व्यवसायिक संस्थेने सभासदांना दसऱ्यानिमित्त ३५ लाख तसेच दिवाळी सणानिमित्त गोकुळ दूध संघ फरक ठेव व्याज व लाभांश १९ लाख अशी एकूण ५४ लाख इतकी रक्कम सभासदांना वाटप केली.

दिवाळी सणाच्या पूर्वी ही रक्कम मिळाल्याने सभासदांतून आनंद व्यक्त होत आहे. संस्थेचे चेअरमन गजानन पाटील,व्हा.चेअरमन रंगुबाई परीट व सर्व संचालकांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली.