कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर पाणी पुरवठा विभागामार्फत पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमेअंतर्गत शहरातील थकबाकीदारांकडून २४ लाख ७७ हजार १०४ रुपये थकबाकी वसूल करण्यात आली. तसेच थकबाकी भरणा न भरलेल्या १३ थकबाकीदारांची नळ कनेक्शन खंडीत करण्यात आली.

यामध्ये शास्त्री नगर, सम्राटनगर, जागृतीनगर, नलवडे कॉलनी, सीपीआर हॉस्पीटल (शासकीय) या भागात फिरती करुन रोख रक्कम रु.२० लाख ४६ हजार २०५ तर गणेशनगर, कंजारपाट वस्ती, शिंगणापुर रोड,फुलेवाडी रिंगरोड परिसरात फिरती करुन रोख रक्कम रु. १ लाख ५७ हजार ३८१ इतकी थकीत रक्कम वसुल करण्यात आली. त्याचबरोबर लक्ष्मीपुरी, मटण मार्केट,बिंदु चौक या भागात फिरती करुन रोख रक्कम रु १ लाख ६० हजार ७०८ इतकी व सदर बाझार येथे फिरती करुन रोख रक्कम रु. १ लाख १२ हजार ८१० इतकी थकीत रक्कम वसुल करण्यात आली.
सदरची कारवाई प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई पाणीपटटी अधिक्षक प्रशांत पंडत, वसुली पथक प्रमुख, मिटर रिडर व फिटर यांनी केली. पाणी पुरवठा विभागाची वसुली मोहिम येथून पुढेही सुरु राहणार असलेने शहरातील व ग्रामीण भागातील सर्व थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार असून थकबाकीदारांनी आपली थकीत पाणी बिलाची रक्कम त्वरित भरुन कनेक्शन बंद करणे, मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखे कटू प्रसंग टाळावेत असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.