दिव्यांग ओळखपत्रासाठी आर्थिक मागणी केल्यास तक्रार करावी-दीपक घाटे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिव्यांगाचे ओळखपत्र देण्यासाठी कोणी आर्थिक मागणी केली असल्यास त्यांना पोलीस विभागात तक्रार करून पकडून द्यावे जेणेकरून दिव्यांगाची आर्थिक फसवणूक होणार नाही असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.

दिव्यांगाना देण्यात येणारे समाज कल्याण विभागाचे ओळखपत्र शासनाने रद्द केले असून २ ऑक्टोबर २०१८ पासून वैश्विक ओळखपत्र बंधनकारक केले आहे. काही रक्कम घेऊन दिव्यांगाना बोगस ओळखपत्र ज्यावर शिक्काही बोगस व सही सुद्धा बोगस आहे अशी ओळखपत्रे वाटप चालू असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.सदरचे ओळखपत्र देण्याचे अधिकार समाज कल्याण विभागास नसल्याने या ओळखपत्राचा कोठेही उपयोग होत नाही याची सर्व दिव्यांगानी नोंद घ्यावी असेही दीपक घाटे यांनी सांगितले आहे.

🤙 9921334545