कोल्हापूर (प्रतिनिधी) : साखर तंत्रज्ञानाप्रमाणेच गूळ तंत्रज्ञानासारख्या विषयांचा अभ्यासक्रमही घेतला पाहिजे. त्यातून आधुनिक तंत्रज्ञानयुक्त गूळ निर्मितीसाठी प्रोत्साहन मिळेल असे आवाहन राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ.अनिल काकोडकर यांनी केले.लहान लागवड क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्रितपणे गूळ व्यवसाय करावा.गूळ व्यवसायाकडे शेतकऱ्यांनी संधी म्हणून पाहावे, असेही ते म्हणाले.

शिवाजी विद्यापीठाचे डॉ.पी.एस.पाटील यांनी विद्यापीठातील प्रयोगशाळा गूळ संशोधनासाठी देण्याबाबत सहकार्याची ग्वाही दिली. यावेळी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी प्रास्ताविक केले.डॉ.बी. जी.गायकवाड व डॉ.जी.बी.येनगे यांनी संशोधनविषयक कार्याचे सादरीकरण केले. विशेषज्ज्ञ डॉ.बी.टी.रासकर यांनी ऊस वाणाविषयी माहिती दिली.
यावेळी प्रा.एस.महाजनी, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञानचे सल्लागार डॉ.ए.व्ही. सप्रे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. आर. आर. सूर्यवंशी, सदस्य सचिव प्रा. एन. जी. शहा, प्रा. ए. एम. गुरव, प्रा. जे. पी. जाधव, कार्यालय अधीक्षक डी. एस. पाटील, एम. आर. पांडव, ए. व्ही. पांडव, के. बी. गुरव, एस. यू. पाटील, ए. एस. जाधव व डी. एस. पाटील उपस्थित होते.