श्रीधर भस्मे, अहमद सुतार, राहुल पाटील यांची निवड !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लघुलेखक संवर्गातील कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी जिल्हाध्यक्षपदी श्रीधर भस्मे, उपाध्यक्षपदी अहमद सुतार तर सचिवपदी राहुल पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील विविध विभागात कार्यरत लघुलेखक यांच्या राज्यस्तरीय चर्चासत्राचे औरंगाबाद येथे आयोजन करण्यात आले होते. सदर चर्चासत्रास महाराष्ट्र राज्य सरकारी मोफुसील स्टेनोग्राफर असोशिएशनचे अध्यक्ष हरिश वरुडकर, सरचिटणीस दिलीप देशपांडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या चर्चासत्रात लघुलेखक संवर्गाच्या विविध मागण्या, समस्या व अडीअडचणीबाबत चर्चा करण्यात आली. विविध विभागातील रिक्त पदे भरणे, व्यपगत पदे पुनर्जिवित करणे, लघुलेखक निम्नश्रेणी व उच्चश्रेणी यांना राजपत्रित दर्जा बहाल करणे तसेच महाराष्ट्रात जिल्हा पातळीवर संघटनेचे सक्षमीकरण करण्याकरण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

त्यांस अनुसरुन कोल्हापूर जिल्हयातील शासकीय कार्यालयात कार्यरत लघुलेखक संवर्गाच्या विविध विषयांबाबत तसेच जिल्हास्तरीय कार्यकारीणी गठीत करण्यासंदर्भात एक बैठक संपन्न झाली. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर या संस्थेत कार्यरत असणारे श्रीधर भस्मे, निम्नश्रेणी लघुलेखक, अधिष्ठाता यांचे स्वीयसहाय्यक यांची अध्यक्षपदी तर सचिव पदासाठी राहूल पाटील, उच्चश्रेणी लघुलेखक मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद कोल्हापूर यांचे स्वीयसहाय्यक तर अहमद सुतार, उच्चश्रेणी लघुलेखक उपसंचालक, आरोग्य सेवा यांचे स्वीयसहाय्यक यांची उपाध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्यल उपस्थित लघुलेखक यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. या बैठकीत लघुलेखक संवर्गातील विविध अडीअडचणींवर चर्चा करण्यात आली.