पडळ (प्रतिनिधी) : केर्ले (ता.करवीर) येथे झालेल्या आठव्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत यवलूज (ता.पन्हाळा) येथील अॅकॅडमीच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले.
या स्पर्धेत समर्थ माने, वैदही पाटील, संस्कार पाटील, संकेत मगदूम यांनी सुवर्णपदक तर स्वरा देवेकर, पूर्वजा पाटील, वैष्णवी पाटील, श्रेया पाटील, समरजित पाटील, साहिल पाटील यांनी कास्यपदक पटकावले.या स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यांतून १०८० विद्यार्थी सहभागी झाले होते. यासर्व खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक अमर तोडकर,महिला प्रशिक्षक करिष्मा धनगर,वैष्णवी देवेकर यांचे मार्गदर्शन लाभले.