मुंबई (वृत्तसंस्था) : धनुष्यबाण या निवडणूक चिन्हा संदर्भातील दाव्याबद्दलचे पुरावे सादर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेली मुदत आज (शुक्रवारी) संपुष्टात येत आहे. त्यामुळे आज हा निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कारण, दोन्ही गटांना पुरावे सादर करण्यासाठी दिलेली मुदत आज संपत आहे. त्यातच शिंदे गटाने अर्ज करुन उद्धव ठाकरे गटाकडे पुरेसे पाठबळ नसताना त्यांच्याकडून धनुष्यबाण या चिन्हाचा अंधेरी पोटनिवडणुकीत चुकीच्या पद्धतीने वापर केला जाईल असा दावा केला आहे. याच कारणामुळे तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.