16 ऑक्टोंबर जागतिक भूलदिनाला जनजागृतीची ज्योत दिल्लीला पोहोचणार

कोल्हापूर : भारतीय भूलसंघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमीत्ताने भारतभर भूलशास्त्र व भूलतज्ञ विषयक, जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. १६ आक्टोबर हा जागतिक भूलदिवस आहे.त्यादिवशी संपूर्ण देशभरातून जनजागृतीची ज्योत राजधानी दिल्लीला पोहोचणार आहे.


कोल्हापूर भूलतज्ञ संघटना या ज्योतीचे ३ आक्टोबर रोजी कोल्हापूर मध्ये स्वागत करणार आहे. त्या दिवशी कोल्हापूरातील प्रसिद्ध स्थळांवर दसरा चौक, छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पीटल, रंकाळा, राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळ, नवा राजवाडा, येथे जनजागृती संदर्भात कार्यक्रम नियोजीत केला आहे. ज्यामध्ये भूलशास्त्र व भूलतज्ञ विषयक माहिती देऊन लोकांना भुलशास्त्राचे महत्त्व सांगणे हा उद्देश असणार आहे . तिथुन पुढे ही ज्योत डी. वाय. पाटील हॉस्पीटलला येईल येथे जनजागृती संदर्भात चर्चासत्र आयोजित केले आहे. येथे जीवन संजीवनी चे प्रात्याक्षिक दिले जाईल व त्याच बरोबर कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल. इथून पुढे ज्योत दिल्लीसाठी रवाना होणार असल्याची माहिती कोल्हापूर भूलतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. रश्मी चव्हाण ,डॉ. शितल देसाई ,डॉ. संदीप कदम, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. किरण भिंगार्डे यांनी पत्रकार परिषदेत दिली