गारगोटी (प्रतिनिधी) : बांधकाम कामगारांसाठी असणाऱ्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक कामगाराने घेतला पाहिजे. त्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर व आमच्याकडून निश्चितच सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन केडीसीसी बँकचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर यांनी केले.

पिंपळगाव जिल्हा परिषद मतदार संघातील 300 हून अधिक बांधकाम कामगारांना सुरक्षा किट वाटप कार्यक्रमात आबिटकर बोलत होते.
यावेळी आबिटकर म्हणाले, गेली दोन वर्षे कोरोना महामारी संकटामुळे बांधकाम कामगारांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. बांधकाम कामगारांचे प्रश्नळ शासन दरबारी सुटावेत, यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांचे शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्या योजना समजावून घेऊन त्यांचा लाभ कसा मिळेल, यासाठी बांधकाम कामगारांना काम केले पाहिजे. त्यासाठी पाठपुरावा महत्त्वाचा आहे. तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. संघटितपणा फार महत्त्वाचा आहे.
यावेळी बांधकाम कार्यालयाचे सईद मुजावर, सोयब शेख, विद्याधर परीट, दिंडेवाडी सरपंच श्रीधर भोईटे, माजी सरपंच बाळासाहेब वर्णे, बिद्री सरपंच मधुकर देऊलकर, उपसरपंच राजाराम सुतार, मा. उपसरपंच सचिन कांबळे, मनोहर नलगे, सुनिल किरोळकर, मोहन पाटील, बारवे सरपंच उमेश पाटील, माजी सरपंच योगेश पाटील, राजू भारमल, भेंडवडे माजी सरपंच नामदेव पाटील, माजी उपसरपंच रमेश पाटील, उत्तम धावडे, चिमाजी चिले, बाबूराव शिऊडकर, भिमराव रेडेकर, रघूनाथ बोटे, सागर मिसाळ, पलाने महाराज, बबन निळपणकर, नामदेव गडकरी, राजाराम भराडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.