नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात केंद्र सरकारने ‘पीएफआय’ संघटनेवर बंदी घातली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियासोबतच केंद्र सरकारने रिहॅब इंडिया फाऊंडेशन, कॅम्पस फ्रण्ट ऑफ इंडिया, ऑल इंडिया इमाम्स काऊन्सिल, नॅशनल कॉनफ्रडेशन ऑफ ह्युमन राइट ऑर्गनायझेशन, नॅशनल वुमन्स फ्रण्ट, ज्युनियर फ्रण्ट, एम्पॉवर इंडिया फाऊंडेशन अँड रिहॅब फाऊंडेशन केरळ या संस्थांवरही बेकायदेशीर संस्था म्हणून बंदी घातली आहे.
मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणेनं ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेविरुद्ध मोठी कारवाई केली. गेल्या आठवड्यात ‘एनआयए’ने महाराष्ट्रासह देशात १५ ठिकाणी छापेमारी करत सुमारे १०६ ‘पीएफआय’ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर मंगळवारी केलेल्या कारवाई एनआयएने आणखी १७० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.