हातकणंगले (प्रतिनिधी): माणगाव (ता.हातकणंगले) येथे आरतीचा मान गावातील विधवा महिलांना देण्यात आला. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी वैष्णवी मंदिरात देवीची आरती अकरा विधवा महिलांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर या विधवा महिलांना हळदी कुंकू, ओटी देऊन ट्रस्टच्या महिला सदस्यांनी त्यांचा सन्मान केला.

यावेळी सरपंच राजू मगदूम यांनी वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्वच सदस्यांचे आभार मानले. यावेळी उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. याआधी माणगाव ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेतला होता. त्यालाही गावामधील सर्वच ग्रामस्थांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला होता.
