बीड प्रतिनिधी : शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या काय झाडी,काय डोंगार या डायलॉगची पुनरावृत्ती भाजपच्या पंकजा मुंडे यांनी केली आहे.पंकजा मुंडेंनी ‘काय हायवे,काय हॉटेल’ म्हणताच सभागृहात एकच हश्शा पिकली.

बीड येथील मांजरसुंबा येथे पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत ऊसतोड कामगार आणि मुकदमांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी राष्ट्रीय हायवेच्या कामावर समाधान व्यक्त करत ‘काय हायवे… काय हॉटेल… सर्व कसं ओकेच..’ असं म्हणताच उपस्थितांमधून एकच हशा पिकली.