‘पीएफआय’ संघटनेचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न

औरंगाबाद प्रतिनिधी : औरंगाबादमध्ये किराडपुरा भागात मनसेनं पीएफआय संघटनेचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला आहे.

मनसे शहर उपाध्यक्ष अमित भांगे यांचा पी.एफ.आय.कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न केला. पीएफआयच्या घरात घुसून मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पण वेळीच पोलिसांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांनी झेंडे, रंग, इत्यादी साहित्य ताब्यात घेतलं.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पीएफआय आणि संबंधित आंदोलकांवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी फेसबुकवर संबंधित व्हिडीओ शेअर करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे घोषणाबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच ही कीड समूळ नष्टच करा, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. याशिवाय ‘तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा’ असा देखील उद्गार राज ठाकरे यांनी काढला आहे.