झिम्मा-फुगडी स्पर्धेत नागनाथ गणेश मंडळ प्रथम

कागल प्रतिनिधी : कागल येथे राजमाता जिजाऊ महिला समिती व राजे विक्रमसिंह घाटगे फौंडेशन आयोजित केलेल्या महिलांच्या झिम्मा -फुगडी स्पर्धेत सोनाळीच्या नागनाथ गणेश मंडळाने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली तर द्वितीय क्रमांक राजमाता महिला संघ बोळावी यांनी पटकावला. तृतीय क्रमांक नंदिनी गौरी गणपती ग्रुप व्हन्नुर यांनी पटकावला. चौथ्या क्रमांकाचा मान श्री महालक्ष्मी ग्रुप व्हन्नाळी यांनी तर हिंदुस्तान महिला संघ शिंदेवाडी यांनी पाचवा क्रमांक पटकावला.विशेष म्हणजे या स्पर्धेस उपस्थित असलेल्या पाच महिलांना लकी ड्रॉ पद्धतीने पैठणी साडी भेट देण्यात आली . पाच हजार हून अधिक महिलांनी या स्पर्धेसाठी उपस्थिती लावली होती.

या स्पर्धा शाहु हॉल कागल येथे पार पडल्या.स्पर्धेचे बक्षीस वितरण शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे, राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना नवोदिता घाटगे म्हणाल्या,आपण कितीही आधुनिक बनलो तरी आपल्याला आपली संस्कृती नजरेआड करता येणार नाही.प्रत्येक सण, उत्सव साजरे करताना आपण पारंपरिकता व संस्कृतीचे जतन करीत असतो. स्पर्धेत सहभागी झालेल्या शहरी आणि ग्रामीण भागातील महिलानी आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचे उत्तम दर्शन घडवले. ग्रामीण भागातील महिलांचे सादरीकरण तर थक्क करणारे होते. स्पर्धेला उत्सवाचे स्वरूप आले. आपल्या संस्कृतीचा हा अनमोल ठेवा अखंड जपण्यासाठी जिजाऊ समिती आणि राजे फौंडेशन सदैव अग्रेसर राहील.

सदर स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण केल्यामुळे भारतासह स्वीडन,दुबई,अमेरिका, इंग्लंड ,मलेशिया, चीन, जपान, कॅनडा, रशिया या देशातील नागरिकांनीही या स्पर्धा ऑनलाईन पाहिल्या.महिला पुढे येण्यासाठी तयार आहेत पण त्यांना कोणीही व्यासपीठ निर्माण करून देत नाही.यापुढे महिलांच्यासाठी हे व्यासपीठ आम्ही देऊ असंही त्या म्हणाल्या.

स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे :

उखाणे स्पर्धा

१)कागल विभाग :
प्रथम क्रमांक -भक्ती अंकुश कांबळे ( कागल ) , द्वितीय क्रमांक सुलोचना शिवाजी लोहार (कागल) तृतीय क्रमांक राजनंदिनी तानाजी जाधव (शेंडूर) .

२) मुरगुड विभाग
प्रथम क्रमांक – संगीता संजय पाटील (वाळवे खुर्द) द्वितीय क्रमांक- वैशाली ज्योतीराम खवरे (मांगनूर) तृतीय क्रमांक- सरिता दिनकर वंदुरे (शिंदेवाडी)

३) गडहिंग्लज विभाग
प्रथम क्रमांक – शकुंतला विश्वनाथ बिरंबाळे (होण्याळी) द्वितीय क्रमांक – सुशीला पांडुरंग सांगले (उत्तुर ) तृतीय क्रमांक -भारती सुनील ससाने (लिंगनूर क. नूल)

जात्यावरील ओव्या

१) कागल विभाग –
प्रथम क्रमांक – सविता बाळासो गुरव ( व्हन्नुर )
द्वितीय क्रमांक – सरीता बाळासो नलवडे (व्हन्नूर )
तृतीय क्रमांक- रेखा राजेंद्र पोतदार (कागल)

२) मुरगुड विभाग
प्रथम क्रमांक – शितल शिवाजी शिंदे (शिंदेवाडी )
द्वितीय क्रमांक- बानुबाई आनंदा गडकरी (हसुर)
तृतीय क्रमांक – रूपाली यशवंत वंदुरे (शिंदेवाडी)

३) गडहिंग्लज विभाग
प्रथम क्रमांक- जयश्री संतोष आगलावे (हिरलगे ) द्वितीय क्रमांक भारती सुनील सासणे ( लिंगनूर क.नुल) तृतीय क्रमांक – सिंधुताई सुभाष पाटील (अत्याळ)

पारंपरिक वेशभूषा

प्रथम क्रमांक – विद्या विनायक हिरूगडे (बानगे ) द्वितीय क्रमांक- वंदना रघुनाथ चौगले (मुरगुड) तृतीय क्रमांक – स्वाती विशाल राऊत ( कागल ) चौथा क्रमांक- नेहा अजिंक्य काळेवेरे ( कागल) पाचवा क्रमांक मेघा युवराज पोवार (व्हन्नाळी)