शाहू  कुस्ती स्पर्धेचा निकाल जाहीर !

कागल प्रतिनिधी : शाहू साखर कारखान्याच्या ३६ व्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत पुरुष गटात आणूरच्या अभिषेक कापडे याने बानगेच्या उत्तम पाटील याच्यावर तर महिला गटात शाहू साखरच्या सृष्टी भोसले हिने यळगुडच्या प्रेरणा डंकेवर मात करून प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, जेष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू  साखर कारखान्याने या मॅटवरील कुस्ती स्पर्धा सलग 36 व्या वर्षी भरविल्या. महिला व पुरुष यांच्या  विविध ३१ गटांमध्ये  या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत एकूण ५९६ मल्लांनी भाग घेतला.

सलग दुसऱ्या वर्षी महिला मल्लांचा  समावेश होता. महाराष्ट्र राज्याच्या साखर कारखानदारीत महिला गटात सलग दुसऱ्यावर्षी ही स्पर्धा आयोजनाचा मानसुद्धा शाहू कारखान्याने मिळविला.

कुस्ती हेच जीवन व महाखेल स्पोर्टस या यूट्यूब चैनलवरून कुस्ती शौकिनांना पाहण्यासाठी स्पर्धेचे थेट प्रसारण करण्यात आले होते. भारतासह पाकिस्तान, सौदी अरेबिया, कॅनडा, इटली,कुवेत, नेपाळ, कतार, जर्मनी, ग्रीस आदी सतरा देशातील सव्वा लाखहून अधिक कुस्ती शौकिनांनी ऑनलाइन पद्धतीने ही स्पर्धा पाहून आनंद लुटला .

कुस्तीतील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे :

पुरुष विभाग: सीनियर गट- ८५किलो- अभिषेक कापडे (अनूर),ऋषिकेश पाटील(बानगे), अक्षय साळवी (बानगे), सातापा हिरवडे (बागे)

७४ किलो गट-निलेश हिरुगडे (शाहू साखर),अनिकेत हवलदार (दिंडनेर्ली), उमेश टिपुगडे (सोनगे), सचिन बाबर (बानगे)

६६ किलो गट-सद्दाम शेख (वडगाव), अक्षय मुळीक (वडगाव), प्रताप पाटील (बेलवळे बुद्रुक),रवींद्र लोहार (मौजे सांगाव)

60 किलो गट-सुदर्शन पाटील (हदनाळ),संतोष बोराटे (व्हन्नूर),अभिषेक तिवले (कळंबा),कुमार बनकर (कोगील बुद्रुक)

५५ किलो गट-वैभव मगदूम (कागल), संदेश बोराटे (व्हन्नूर), रोहित पाटोळे (बानगे, निखिल जितकर (गोरंबे)

ज्युनिअर गट

65 किलो गट-जय भांडवले (शेंडूर), हर्षद बच्चे (हदनाळ),सौरभ बोंगार्डे (बानगे),हर्षवर्धन खांडेकर (लिंगनूर)

 ६० किलो गट-सुशांत पाटील (म्हाकवे), सुशांत संकपाळ (कंदलगाव), सुशांत पाटील (साके), सुशांत चौगुले( नंदगाव)

 ५६ किलो गट-रोहित पाटील (बानगे), शुभम चौगुले (नंदगाव ),अभिजीत पवार (पुलाची शिरोली ),सतीश कुंभार (शाहू साखर)

 ५२किलो गट-अजित कुद्रेमनकर (कंदलगाव), प्रतीक इंगळे (गोरंबे), वैभव जाधव(बानगे), प्रतीक पवार (तळंदगे )

48 किलो गट-किरण चौगुले (नंदगाव )ओंकार मिसाळ (कागल )शिवतेज सुतार (यळगुड )पार्थ पाटील (ईस्पुर्ली )

45 किलो गट-गौतम बनकर (कोगील) संदेश करपे (व्हन्नूर )महेश मगदूम (पिंपळगाव)

 ४२किलो गट-अनिकेत पाटील (व्हनाळी )विघ्नेश चौगुले (नंदगाव )शुभम चौगुले (नंदगाव)

 कुमार गट

60 किलो गट-दिग्विजय पाटील( एकोंडी )सनी रानमाळे (ईस्पुर्ली )ज्ञानेश्वर शिंदे (बेलवळे बुद्रुक )राजवर्धन पुजारी (मुरगुड)

 56 किलो  गट-रोहित येरुडकर (पिंपळगाव बुद्रुक) पवन मेटकर (खडकेवाडा) स्वरूप जाधव (वडगाव )संकेत चौगुले (नंदगाव )

५२ किलो गट-अंकुश खतकर (भडगाव) हर्षवर्धन मेथे (बानगे) साईल बोराटे (कंदलगाव) हर्षवर्धन पाटील (बेलवळे बुद्रुक )

48 किलो गट-सोहम कुंभार (शाहू साखर) विश्वजीत गिरी बुवा (रणदिवेवाडी) कौतुक शिंदे (मुरगुड) पियुष वाडकर (दिंडनेर्ली )

 45 किलो गट-प्रथमेश बोंगाडे (बानगे )यशवर्धन पवार( बिद्री साखर )साईराज वाडकर (व्हनाळी )यश हवलदार (तळंदगे)

 42 किलो गट-प्रतीक पाटील( पाचगाव) आतिष कोरे (खेबवडे) महेश पाटील (सिद्धनेर्ली) आदित्य माने (कळंबा )

४० किलो गट-प्रथमेश पाटील (बानगे) धीरज डाफळे) पिंपळगाव बुद्रुक आदिनाथ माने (पिंपळगाव बुद्रुक )श्रीधर मगदूम (कुरली)

 37 किलो गट-ओम पाटील(दिंडनेर्ली ) हर्षवर्धन शितोळे (मुरगुड) ओंकार जाधव (शाहू साखर )विश्वजीत चौगुले (यळगुड )

बालगट

 41 किलो गट-धनराज जमनिक(बाणगे )राजवर्धन पाटील (पाचगाव) सयाजी पाटील (बेलवळे खुर्द )साई जाधव (सुळकुड )

38 किलो गट-हर्षवर्धन माळी (शाहू साखर) समर्थ पाटील (सावडे बुद्रुक )आदित्य पाटील( बानगे) प्रणव भोसले (गोरंबे )

35 किलो -गट श्रेयशा बोडके (वडगाव )प्रथमेश पाटील( बाचणी) सुयोग साठे (नंदगाव )गणेश ताकमारे( कोगील बुद्रुक)

 32 किलो गट-शिवानंद मगदूम (सिद्धनेर्ली) पृथ्वीराज शिणगारे (तळंदगे) सोहम पाटील (कंदलगाव )सुमित चौगुले (तळंदगे)

30 किलो गट-शुभम जठार (बाणगे) गौरव पाटील (नंदगाव )अनुराग ताकमारे (कोगील बुद्रुक) संदेश गुजर (मुरगुड)

 28 किलो गट-रितेश मगदूम (बाणगे) समर्थ वरपे (मुरगुड) पृथ्वीराज मोहिते( कोगील बुद्रुक) नील भारमल (भडगाव)

 26 किलो गट-रितेश यादव (उचगाव) आदर्श पवार (यळगुड )ओममाळी( रणदिवेवाडी) श्रेयस पुजारी (तळंदगे)

 24 किलो गट-सत्यजित निचिते (व्हनाळी )रुद्राक्ष तळेकर (केनवडे) शिवेंद्रकुमार पाटील( बामणी) प्रद्युम्न हिरुगडे( बानगे)

 महिला गट

65 किलो गट-सृष्टी भोसले (शाहू साखर) प्रेरणा डंके (यळगुड ) सई संकपाळ (पाचगाव)

 55 किलो गट-वैष्णवी आहेरकर (यळगुड )प्राची माने (बाणगे) सानिका लोकरे (आनुर)

 50 किलो-पूजा पाटील (बानगे) ऋतिका पाटील (पाचगाव) अनुराधा आहेरकर (यळगुड )