कोल्हापूर प्रतिनिधी : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने (स्वायत्त संस्था) अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२२-२३ बाबत मार्गदर्शनपर सेमिनारचे मंगळवारी हॉटेल सयाजी येथे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २ वाजता सुरु होणाऱ्या या सेमिनारमध्ये डी.वाय.पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता व महाराष्ट्र राज्य सीईटी सेलचे प्रवेश प्रक्रिया तज्ञ कुणाल वाय.पाटील हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.
गेल्या ३८ वर्षांपासून गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणासाठी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय ख्यातनाम आहे. उच्च शैक्षणिक परंपरेच्या या संस्थेला दोन वर्षापूर्वी स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळाला आहे. त्याचबरोबर नॅक ‘अ’ श्रेणी व एनबीए मानांकन प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर काही दिवसापूर्वीच मध्यम क्षेत्रातील सुप्रसिध्द असलेल्या ‘नवभारत’ गृपच्या वतीने ‘बेस्ट ओटोनॉमस इंस्टीटयूट’ म्हणून महाविद्यालयाचा गौरव करण्यात आला आहे.
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती मिळावी व उत्तम अभियंता बनण्याचे स्वप्न सुकर व्हावे या हेतूने सामजिक जबाबदरीतून डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय गेली 9 वर्षे या मार्गदर्शनपर उपक्रमाचे आयोजन करत आहे. या सेमिनारला दरवर्षी सुमारे १२०० विद्यार्थ्यांची उपस्थिती असते.
या सेमिनारमध्ये अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेशी संबंधित सर्व विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये अभियांत्रिकी म्हणजे काय आणि अभियांत्रिकीच्या विविध शाखा, अभियांत्रिकी शिक्षणाविषयी समज-गैरसमज,अभियांत्रिकीनंतरच्या विविध करिअरच्या संधी, अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२२-२३ या बद्दल सविस्तर माहिती, प्रवेशासाठी लागणारी पात्रता व महत्वाची कागदपत्रे, एमएचटी- सीईटी २०२२च्या निकालाचे विश्लेषण, विविध शासकीय शिष्यवृत्ती, महाविद्यालय आणि शाखा कशी निवडावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
उत्कृष्ट अभियंता बनून उत्तम करिअरची संधी मिळवण्यासाठी सर्व विद्यार्थी व पालकांसाठी हा सेमिनार मार्गदर्शक व महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. संतोष चेडे, अॅडमीशन सेलचे प्रमुख रविंद्र बेन्नी, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे यांनी केले आहे.