मुंबई विद्यापीठाच्या प्र.कुलगुरू पदाचा कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे पदभार

कोल्हापूर प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.दिगंबर तुकाराम तथा डी. टी. शिर्के यांच्याकडे मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठाचे सुहारा कुलगुरुपदाचा कार्यकाल १० सप्टेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा प्रभारी कार्यभार डॉ. शिर्के यांच्याकडे सोपविण्यात निर्णय झाला आहे.

शिवाजी विद्यापीठाचे १३ वे कुलगुरू म्हणून डॉ. डि. टी. शिर्के सध्या कार्यरत आहेत. ते मुळचे हातकणंगले तालुक्यातील वाठार तर्फ वडगाव येथील आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून संख्याशास्त्र विषयात एम. एस. सी केले. त्यानंतर त्यानी याच विद्यापीठातून एम.फील आणि पी.एचडी केली. त्यानंतर ते याच विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विभागप्रमुख प्रभारी कुलसचिव प्र-कुलगुरु या पदावर त्यांनी काम केले आहे.

🤙 9921334545