कागल नगरपरिषदेच्या पर्यावरण पूरक गणेश विसर्जन उपक्रमास प्रतिसाद

कागल (प्रतिनिधी): कागल नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी टीना गवळी यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या पर्यावरण पूरक गणेश विसर्जन उपक्रमास नागरिकांमधून चांगला प्रतिसाद मिळाला.

या उपक्रमांतर्गत कागल शहरात १० प्रभागांमध्ये १२ ठिकाणी गणेश मूर्ती व निर्माल्य  स्वीकारण्यास पथके तयार करण्यात आली होती. सदर १२ ठिकाणी साधारण ९५०  मूर्ती उस्फूर्त पणे दान करून पर्यावरण पूरक गणेश विसर्जनास नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे.

 तसेच नदी काठावर ही जवळपास ३५५ गणेश मूर्ती नागरिकांनी नगरपरिषदेस दान केल्या आहेत.जवळपास १३५० ते १४०० च्या आसपास मूर्ती नगरपरिषदेणे दिवसभरात स्वीकारल्या आहेत. त्याचबरोबर दिवसभरात १.५ टन निर्माल्य नगरपरिषदेने संकलन केले. याकामी नगरपरिषदेने १२ पथके तयार करून सर्व खात्याचे अधिकारी कर्मचारी नेमले होते. तसेच नदीकाठावर अग्निशमन पथक कार्यरत ठेवण्यात आले होते. नगरपालिकेने राबवलेल्या या उपक्रमाबद्दल नागरिकांनी  समाधान व्यक्त केले.

🤙 9921334545