अखेर ठरलं ! कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी ठरला ‘हा’ मार्ग

कोल्हापूर प्रतिनिधी : यंदाच्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पारंपरिक महाद्वार रोड विसर्जन मिरवणूकीसाठी खुला राहील. तसेच यासोबत पर्यायी दोन मार्गही विसर्जन मिरवणुकीसाठी उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळांची आज मंगळवारी दसरा चौक येथील शाहू स्मारक  येथे बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी ते बोलत होते.

दोन वर्षाच्या कोरोना महामारीच्या संकटानंतर यंदा गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. कोल्हापुरातही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा होत आहे. चालू वर्षीच्या कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग कोणता असावा, यावर मतमतांतर सुरु होती. यासाठी पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळांची बैठक पार पडली. यामध्ये अखेर कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग ठरला.या बैठकीत शासनाच्या नियमाप्रमाणे साऊंड सिस्टीम मध्यरात्री १२ वा.पर्यंतच सुरु राहील असं पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्पष्ट केलं.

या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, शहर वाहतुक पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी, शहरातील सर्व पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्यासह आर. के.पोवार, बाबा पार्टे, रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक अनिल कदम, सुजित चव्हाण, मनसेचे राजू जाधव, बंडा साळोखे यांच्यासह शहरातील सर्व तालीम मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

गणेश विसर्जनासाठी दोन पर्यायी मार्ग

पर्यायी मार्ग क्र.१

सावित्रीबाई फुले हॉस्पिटल-हॉकी स्टेडियम–संभाजीनगर ते क्रशर चौक

पर्यायी मार्ग क्र.२

उमा टॉकीज-बिंदू चौक-शिवाजी चौक-पापाची तिकटी-गंगावेश-रंकाळा स्टँड-रंकाळा  टॉवर ते इराणी खण

🤙 9921334545