सीबीआयचे ‘यांच्या’ घरी छापे

नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांच्या घरी सीबीआयचे छाप पडले आहेत. दिल्लीतील शाळांमध्ये २०० कोटींचा घोटाळा झाल्याच्या आरोपावरून मनीष सिसोदिया यांच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे. शिक्षण खात्यातील घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी दिल्लीचे उपराज्यपाल विनय सक्सेना यांनी केली होती.

मनीष सिसोदिया यांनी ट्विट करून त्यांच्या घरी झालेल्या सीबीआय छापेमारीची माहिती दिली. “सीबीआय आली आहे. त्यांचं स्वागत आहे. आम्ही कट्टर प्रामाणिक आहोत. लाखो लहान मुलांचं भविष्य घडवत आहोत. पण, आपल्या देशात जे चांगलं काम करतात त्यांना अशा पद्धतीने त्रास दिला जातो. म्हणूनच आपला देश अद्यापही एक नंबर झालेला नाही.”

आम्ही सीबीआयचं स्वागत करतो. चौकशीत आम्ही पूर्ण सहकार्य करू, जेणेकरून सत्य लवकरच समोर येईल. आतापर्यंत माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले पण काही साध्य झालं नाही. या प्रकरणातही काही मिळणार नाही. देशातील चांगल्या शिक्षणासाठी मी करत असलेलं काम कोणी रोखू शकत नाही,’ असं ट्विट मनिष सिसोदिया यांनी केलं आहे.

‘हे लोक दिल्लीतील आरोग्य आणि शिक्षणासाठी सुरू असलेल्या चांगल्या कामामुळे त्रस्त आहेत. म्हणूनच दिल्लीतील आरोग्य मंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना यांनी पकडलं आहे, जेणेकरून शिक्षण आणि आरोग्यासाठी सुरू असलेली चांगली कामं रोखता येतील. आमच्या दोघांवरही खोटे आरोप आहेत. पण न्यायालयात सत्य काय ते समोर येईलच,’ असंही सिसोदिया म्हणाले.