संजय राऊत यांना ‘एवढ्या’ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय राऊत यांची आज ईडीची कोठडी संपली असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयातील सुनावणी दरम्यान त्यांना 14 दिवसांची म्हणजेच 22 ऑगस्टपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने 31 जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. या घोटाळ्याप्रकरणी 4 ऑगस्ट रोजी न्यायालयात सुनावणी झाली होती. त्यावेळी त्यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती.

संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी 31 जुलै रोजी ईडीने अटक केली. त्यापूर्वी सुरूवातील सकाळी संजय राऊतांच्या घरी ईडीने छापेमारी केली. यामध्ये काही कागदपत्रे ईडीच्या हाती लागली. त्यानंतर ईडीने संजय राऊतांना ताब्यात घेत, दक्षिण मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी नेले होते. त्यानंतर काही तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.

🤙 9921334545