टीईटी घोटाळ्यात आमदार अब्दुल सत्तारांच्या मुलींची नावे

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळा प्रकरणात माजी मंत्री, शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे आल्याने खळबळ उडाली आहे. परीक्षा परिषदेकडून जी यादी जाहीर करण्यात आली. त्यामधील सर्व अपात्र असणाऱ्या उमेदवारांनी पात्र होण्यासाठी सुपे यांना पैसे दिले होते. परंतु, सुपे यांच्याकडून अपात्र उमेदवारांना पात्र असण्याचे प्रमाणपत्र मिळाले नव्हते. या उमेदवारांमध्ये आता अब्दुल सत्तार यांच्या मुली हिना आणि उजमा यांची नावे असल्याचे समोर आले आहे. या दोघींचीही प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत. याप्रकरणी बदनामीसाठी हा सगळा कट रचल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले.

हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख या दोन्ही शिक्षिका अब्दुल सत्तार यांच्या मुली असून २०२० मध्ये त्या अपात्र ठरल्या आहेत. सायबर पोलीस आणि परीक्षा परिषद यांनी जी यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये या दोन्ही मुलींचा समावेश आहे. यां दोघींची नावे समोर आली असली, तरी त्यांनी नेमक्या कोणत्या एजंटला पैसे दिले याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांच्या अडचणीच वाढण्याची शक्यता आहे.

अब्दुल सत्तार यांच्या मुली हिना आणि उजमा या २०२० मध्ये टीईटी मध्ये अपात्र असल्याच समोर आलं आहे. या प्रकरणी परीक्षा परिषदेकडून यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्व अपात्र असणाऱ्या लोकांनी पात्र होण्यासाठी आरोपी सुपे याला पैसे दिले होते, असा आरोप आहे. आता या प्रकरणी अब्दुल सत्तार यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. हा बदनामीचा कट असल्याचा सत्तार यांनी केला आहे.

माझ्या मुलींनी टीईटी परीक्षा दिली. पण त्या पात्र झाल्या नाहीत. आज अचानक २०२२ मध्ये यादी समोर आली. या चार वर्षांमध्ये कुठेही मुली पास झाल्या असतील आणि त्याचा फायदा घेतला असेल ते दाखवा. शिक्षण खात्यातील एक-एक कागदपत्र कोणीही माहितीच्या अधिकाराखील मागवून बघू शकतो. माझ्या संस्थेमध्ये माझ्यामुली २०१७ मध्ये नोकरीला लागल्या. त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी परीक्षा आणि त्या अपात्र ठरल्या. त्यांची प्रमाणपत्र माझ्याकडे आहेत. कुणाला हवी असतील तर त्याची कॉपीही देतो, असं अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं.

🤙 9921334545