भुदरगड-आजरा उपविभागीय अधिकारी कार्यालयासाठी पावणेसात कोटीचा निधी मंजूर : आ. प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : गारगोटी येथे भुदरगड व आजरा तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालयाची नवीन प्रशस्त इमारत बांधण्यासाठी 6 कोटी 78 लाख रुपयांची निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार प्रकाश आबीटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

भुदरगड व आजरा तालुक्याचे उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालय हे गारगोटी येथे सन 2013 साली मंजूर झाले. यावेळी या कार्यालयाची तात्पुरती सोय म्हणून गारगोटी गाव चावडी जवळील महसूल भवन येथे उपविभागीय कार्यालय सुरू करण्यात आले. अद्ययावत इमारती नसल्याने सरकारचे प्रमुख व अविभाज्य घटक मानले जाणाऱ्या महसूल विभागाचा कारभार कसाबसा छोट्याशा जागेत सुरू होता. यामुळे अधिकाऱ्यांची व नागरिकांची गैरसोय होत होती. यामुळे प्रांत कार्यालयासाठी स्वतंत्र इमारतीची आवश्यकता होती. सदरची इमारत बांधण्यासाठी आवश्यक निधीसाठी आमदार प्रकाश आबिटकर गेली अनेक वर्षापासून पाठपुरावा करत होते या पाठपुराव्यास यश आले असून गारगोटी येथे प्रांत कार्यालयाची नवीन प्रशस्त इमारत बांधण्यासाठी 6 कोटी 78 लाख रुपयांची निधी मंजूर झाल्याची माहिती त्यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

पपत्रकात म्हटले आहे की, भुदरगड व आजरा तालुक्यांचे उपविभागीय अधिकारी कार्यालय हे गारगोटी शहरामध्ये सन 2013 साली सुरू करण्यात आले. त्यावेळी हे कार्यालय करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे हे कार्यालय गारगोटी शहरातील गाव चावडी शेजारील महसूल भवन येथे सुरू करण्यात आले. सदरची जागा आपुरी असल्यामुळे अधिकारी व नागरीकांची गैर सोय होत होती. तसेच प्रशासकीय कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांना मर्यादा येत होत्या. यामुळे प्रांत कार्यालयाची इमारत ही सुसज्ज होणे गरजेचे होते. याबाबत आमदार प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालय स्तरावर केलेल्या पाठपुराव्यामुळे सदर इमारत बांधकामासाठी 6 कोटी 78 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे भुदरगड व आजरा तालुक्यातील नागरिकांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध होणार असून प्रशासकीय कामात अद्यावतपणा आणण्यासाठी नव्याने बांधण्यात येणाऱ्या उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीचा उपयोग होणार असल्याचे सांगितले आहे.