पट्टणकोडोलीत चोऱ्यांची मालिका; नागरिक भीतीच्या छायेत

पट्टणकोडोली (हातकणंगले) : येथे चोरीचे प्रमाण वाढले असून चोरांची वाढती दहशत चिंताजनक आहे. गेल्या सहा ते आठ महिन्यांपासुन गावात अनेक चोऱ्या झाल्याचे निदर्शनास आले आहे.

काही दिवसापूर्वी येथील गणेशनगर येथील अफताब जमादार यांच्या घराचे कुलुप तोडून तिजोरीतील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. दररोज भरणाऱ्या बाजारातही मोबाईल, महिलांच्या गळ्यातील दागने चोरीचे अनेक प्रकार घडत आहेत.चोरीचे असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.काही दिवसापुर्वी सुनिल मोंगले यांच्या शेतात रात्रीच्यावेळी विहीरीतील विद्युत मोटारीच्या पाईपाही चोरट्यांनी लंपास केल्या.काल गुरुवारी रात्री एक ते तीनच्या दरम्यान गावातील विहीरीजवळील राहणाऱ्या मोटर रिपेअरीचे काम करणाऱ्या कुमार नाईक यांच्या घरासमोरील टेक्स्मो कंपनीच्या सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीच्या दोन मोटरी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना असुन गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काबाडकष्ट करुन मिळवलेली त्यामुळे दिवसही जागा रात्रही जागी डोळा लागतो न लागतो लगेच होते चोरी अशी स्थिती पट्टण कोडोलीकरांची झाली आहे.
गावची लोकसंख्या ४० हजाराच्या आसपास आहे जवळच औद्योगिक वसाहत आहे. बाहेर गावाहुनही मोठ्या प्रमाणात लोक कामानिमित्त येणाऱ्यांची मोठी वर्धळ असते याचाच फायदा घेऊन चोर आपला डाव साधत आहेत.