वडणगे : रजपूतवाडी, सोनतळी परिसरात गेल्या काही दिवसापासून डेंग्यू तसेच चिकनगुनिया सदृश्य आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे घरोघरी डेंगू चिकनगुनिया सदृश्य आजाराची लक्षणे असणारे अनेक रुग्ण असून देखील शासकीय पातळीवर आलेल्या सर्वेक्षण पथकाला मात्र एकही रुग्ण मिळाला नसल्याने ग्रामस्थातून आश्चर्य व्यक्त होत आहे संबंधित ग्रामपंचायतीने औषध फवारणी व स्वच्छता मोहीम राबविली.

दरम्यान आज तालुका आरोग्य विभाग आणि भुये प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक आजार सर्वेक्षणासाठी गावांमध्ये आले. या पथकाने संपूर्ण रजपूत वाडी गावाचे सर्वेक्षण केले त्यामध्ये फक्त ४ ठिकाणी डासांच्या अळ्या सापडल्या मात्र एकही पेशंट सापडला नाही अशी माहिती पथकाकडून ग्रामपंचायतीला तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. काही वेळानंतर चिकनगुनिया झालेल्या अनुश्री पाटील या महिलेने पथकामधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना घरी बोलावून घेतले आणि आपला सर्वे तुम्ही केला का नाही? याबाबत जाब विचारला व सर्वे करावयास भाग पाडले. यावेळी घरामध्ये तीन पेशंट आणि डासांच्या आळ्याही सापडल्या त्यामुळे सर्वेक्षण सदोष असल्याचे निष्पन्न झाले.
याच पद्धतीने सध्या गावातील अनेक घरांमध्ये डेंग्यू व चिकनगुनिया सदृश्य आजाराचे रुग्ण आहेत मात्र जे सर्वेक्षण झाले गावातून फेरफटका मारल्याप्रमाणे झाले वास्तविक घरोघरी जाऊन प्रबोधन करणे हे वैद्यकीय पथकाचे महत्त्वाचे काम होते मात्र त्याबाबत कोणतेही गांभीर्य या पथकाने ठेवले नाही दरम्यान हिवताप पथकाने ही गावांमध्ये गावामध्ये सर्वेक्षण केल्याचे समजते त्यांच्याही सर्वे बद्दल शंका व्यक्त होत आहे.
अनेक रुग्णांच्या पर्यंत कोणत्याही प्रकारची पथके पोहोचलेलीच नसल्याचे वास्तव आहे.
दरम्यान, सोनतळी नवीन वसाहती मध्ये रस्ते नसल्यामुळे सर्व गटारी रस्त्यावरूनच वाहतात या ठिकाणी प्रचंड डासांची उत्पत्ती होत आहे. या ठिकाणीही अद्याप सर्वे झालेला नाही
ही बाब तालुका अधिकारी जी डी नलवडे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गावांमध्ये फिरून पाहणी केली व संबंधित कर्मचाऱ्यांची कानउघडणी करून आदेश दिले दरम्यान शासकीय पातळीवर केलेला सदोष सर्वेमुळे ग्रामपंचायत प्रशासनाला नेमके कोणते उपाय करायचे याबाबत प्रशासन संभ्रमात आहेत. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांनी योग्य ती कारवाई आणि कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. दरम्यान साथीच्या आजाराबाबत परिसर स्वच्छ ठेवून लोकांनी सहकार्य करावे ग्रामपंचायत प्रशासन योग्य ती दक्षता घेईल असे सरपंच राजेंद्र कोळी व माजी सरपंच रामसिंग रजपूत यांनी सांगितले
