राज्यात लवकरच सत्तांतर : ‘यांचे’ सूचक वक्तव्य

नवी दिल्ली : राज्यात लवकर सत्तांतर होऊ शकते, आणि असं झाल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, असं सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय संविधान आणि कायद्याविरोधात जाऊन निकाल देणार नाही, याची खात्री असल्याने शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरतील. त्यांना स्वतःचा बचाव करण्याकरता दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागले, मग ते स्वतःला शिवसैनिक कसे म्हणवून घेणार? बंडखोरी केलेले किती आमदार दुसऱ्या पक्षात विलिन होण्याकरता तयार आहेत याची कल्पना आहे आम्हाला. हे आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात पुन्हा सत्तांतर झालं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.

ते पुढे म्हणाले, एखादा गट दुसऱ्या पक्षासोबत युती करत असेल तर त्यावर बोलायची गरज नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती, शिवसेना फोडून पालिकेसह अनेक निवडणुका जिंकायच्या होत्या. भाजपला महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला दुबळं करायचं आहे, असाही घणाघात त्यांनी केला.

राऊत म्हणाले, अर्जन खोतकर यांचं अभिनंदन करतो, की त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं. ते आमचे फार जुने सहकारी आहेत. त्यांनी माध्यमांसमोर सांगितंल की त्यांच्यावर कोणत्या प्रकारचा तणाव आहे आणि कोणत्या यंत्रणेचा तणाव आहे. त्यामुळे त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं. त्यांनी हिंदुत्त्व बदनाम करून शिवसेना सोडली नाही. त्यांनी कोणतीही दुसरी भूमिका न घेता स्पष्ट केलं. ते तणावाखाली आहेत. त्यांची मालमत्ता जप्त झाली आहे. त्यामुळे कुटुंब तणावात आहे. त्यामुळे त्यांच्या प्रामाणिकपणाला दाद देतो.

🤙 8080365706