मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा आज जिल्हा दौरा

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज, सोमवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

सोमवार, दि. 25 जुलै रोजी दुपारी 3 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने छत्रपती संभाजी पार्क, कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी 3.15 वाजता आमदार चंद्रकांत पाटील यांच्या घरी सांत्वनपर भेट व राखीव. दुपारी 4 वाजता मोटारीने विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 4.15 वाजता मुंबईकडे प्रयाण.

    

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा दौरा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सोमवार दिनांक 25 जुलै रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दुपारी 3.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. दुपारी 3.40 वाजता मोटारीने संभाजीनगर, संभाजी पार्क, कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी 4 वाजता आमदार चंद्रकांत पाटील यांच्या घरी सांत्वनपर भेट व राखीव. सायं. 5.30 वाजता मोटारीने विमानतळाकडे प्रयाण. सायं. 5.50 वाजता विमानतळ येथे आगमन.सायं.6 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.