मुख्यमंत्र एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी कोल्हापूरात

भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील यांचे रविवारी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.

या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्र एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी चंद्रकांत पाटील यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी थेट मुंबई हून विमानाने कोल्हापूरला येणार आहेत. हा दौरा खाजगी स्वरूपाचा असून ते लगेच मुंबईला रवाना होणार आहे . अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयातून मिळाली.