शहापूर पोलिसांकडून मोटारसायकल चोरट्यास अटक

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोटरसायकल चोरट्यास अटक केली आहे.

या चोरट्यांकडून मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. कलंदर धोंडीबा हजारे , वय (वर्षे 45, राहणार बागडी गल्ली, कबनूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून सुमारे दोन महिन्यापूर्वी चोरलेली टीव्हीएस स्पोर्ट्स मोटरसायकल ही पेट्रोलिंगच्या दरम्यान मिळून आल्याने प्राथमिक तपास करून पुढील कार्यवाही करिता शिवाजीनगर पोलीस ठाणे, इचलकरंजी येथे जमा केले आहे. सदर कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पो. हवालदार महेश कोरे, साजिद कुरणे, मैजर लाटकर, अर्जुन फातले, अमित भोरे यांनी सहभाग घेतला होता.