कागल (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युतीच्या राज्य सरकारने सादर केलेला बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारत ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास मंजुरी दिली आहे. ओबीसी समाजाला न्याय मिळवून देणाऱ्या या निकालाबद्दल कागल शहर भाजपच्या वतीने साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील गैबी चौक व बस स्थानक येथे फटाक्यांची आतषबाजी साखर पेढे वाटप केले.

ग्रामदैवत गैबी येथे गलेफ घातला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व अण्णाभाऊ साठे यांच्या गैबी चौकातील पुतळ्यास तसेच बस स्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. भारतीय जनता पार्टीच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, अरुण सोनुले, शाहू साखर कारखान्याचे संचालक यशवंत माने, सतीश पाटील, रमीज मुजावर, अरुण गुरव, विवेक कुलकर्णी, प्रमोद कदम, हनुमंत वड्ड, संदीप भुरले, श्रीकांत कोरवी, सुरज भरले, हिदायत नायकवडी, आप्पासाहेब हुच्चे, बाळू नाईक आदी उपस्थित होते